मनःशांतीसाठी काय करावे?

मनःशांती मिळणं हे आपल्या मनाच्या एका स्वभावावर अवलंबून आहे. आपल्या मनाला नेहमी कुठल्या ना कुठल्या dimension मध्ये grow व्हायला खूप आवडतं आणि जेव्हा आपलं मन हे त्याचं आवडीचं काम करतं तेव्हा ते शांत राहतं! उदाहरणार्थ, तुम्हाला C नावाची programming language येते. आता जेव्हा तुम्ही C++ ही पुढची programming language शिकायला लागता, तेव्हा त्या दरम्यान तुम्हाला मानसिक शांतता अनुभवायला मिळते. याचं कारण म्हणजे ही नवीन programming language शिकत असल्यामुळे तुमचं मन एका विशिष्ट dimension मध्ये grow होत असतं. आता ही गोष्ट वेगळी की आपलं मन किंवा मेंदू वापरूनच आपण नवीन programming language शिकत असतो, पण मन एका dimension मध्ये grow होत असल्यानेच ते peaceful असतं.

तसंच, जर तुम्हाला Microsoft Office चा २०१९ किंवा २०२० पर्यंतची सर्व versions वापरायला येत असतील आणि आता जे नवीन version उपलब्ध आहे, ते शिकल्याने तुमच्या professional life मध्ये तुम्हाला खूप फायदा होणार आहे, आणि ते version तुम्ही शिकायला सुरुवात केलीत तर तुम्हाला मनःशांती अनुभवायला मिळेल. तुमचं मन peaceful राहायला लागेल.

मनःशांती मिळवण्यासाठी एकच करायचं आहे – जर नातेसंबंध टिकवण्याचं skill आपल्याकडे नसेल, तर ते शिकायचं आहे. Wealth creation च skill नसेल, तर ते skill शिकायचं आहे. आपलं Life Purpose काय आहे ते जाणून त्या मार्गावर चालायला सुरुवात करायची आहे, ज्यामुळे आपल्याला mental peace अनुभवायला मिळेल. याखेरीज आपली नवीन नवीन sessions जेव्हा तुम्ही ऐकता, YouTube videos ऐकता, तेव्हा त्या विषयांवर focused राहून जर तुम्ही तुमची skills वाढवायला लागलात, तरीही तुम्ही mental peace अनुभवाल. कारण जेव्हा काही नवीन आपल्याला समजतं, तेव्हा मनाला हा संदेश मिळतो की मी grow होतो आहे आणि त्यामुळे मन शांत होतं.

आजचा उपाय नक्की अंमलात आणून बघा. हा उपाय एकदाच वापरून मनःशांतीचा अनुभव घेऊन सोडून दिलात तर मन stagnant होईल आणि तुम्हाला mentally peaceful वाटणार नाही. शिकत राहायचं आहे – relationships बद्दल शिकलं की wealth creation बद्दल, मग anger management बद्दल, मग Life Purpose बद्दल! मनाचा उपयोग करत राहायचा आहे. मन म्हणजे brain in action. त्यामुळे तुमच्या मेंदूला विचारून तुमचे weaknesses, तुमच्याकडे नसलेले skills एका कागदावर लिहून काढा आणि त्यांना strengths मध्ये बदलायला सुरुवात करा. हे केल्याने तुम्हाला मनःशांतीचा अनुभव नक्की मिळेल! 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *