विचारांची energy कशी काम करते?

एकदा एका अरूंद रस्त्यावर एक माणूस त्याची कार घेऊन या रस्त्यावरून जात होता. वाटेत एक दुकान होतं, त्याने गाडी रस्त्यातच लावली आणि तो दुकानात काहीतरी विकत घ्यायला गेला. अरुंद रस्त्यामुळे कारचा मालक परत येईपर्यंत मागे गाड्यांची अक्षरशः रांग लागून सर्व वाहतूक ठप्प झाली होती. खूप आरडाओरडा ऐकू आल्यावर तो माणूस धावत आला. त्याने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा दरवाजाची कड त्याच्या दाताला लागली आणि त्याला खोलवर जखम झाली. आता हा योगायोग होता की नाही हे जाणण्यासाठी आणखी एक प्रसंग बघू.

एका सिनेमागृहात एक जोडपं त्यांच्या बाळाला घेऊन सिनेमा बघायला आलं होतं. सिनेमा चालू असताना ते बाळ रडायला लागलं आणि आई-बाबांना सिनेमा बघायचा असल्याने त्याला शांत करण्यासाठी ते बाहेर गेले नाहीत. जरा वेळाने ते बाळ शांत झालं पण दुसऱ्या दिवशी त्याला अचानक ताप आला. असंच एका सिनेमागृहात एक माणूस आला होता. तिथे लिहिलेली mobile silent करायची सूचना वाचूनही तो mobile silent करायला विसरला. ऐन climax च्या वेळेस त्याचा mobile वाजायला लागला आणि काही केल्या त्याला तो सापडेना. सापडल्यावर तो चटकन बंद होईना! त्याला कळेना की असं का झालं.

या तिन्ही प्रसंगांमधून आपण शिकायची गोष्ट समान आहे. प्रत्येकाच्या मनातली ‘या माणसामुळे traffic jam झालं’ ही negativity त्या कारच्या मालकापर्यंत पोहोचली. प्रत्येकाला कुठेतरी वेळेवर जायचं होतं आणि ते घडण्यात या व्यक्तीमुळे अडचण आली ही भावना मनात असल्यामुळे सगळी negativity त्या व्यक्तीकडे flow झाली. तसंच बाळाच्या रडण्यामुळे सिनेमा बघता येत नाहीये ही negativity त्या बाळाकडे flow झाली व तशीच negativity त्या फोनच्या मालकाकडे flow झाली आणि त्याचा फोन बंद झाला नाही. हे आहे energy science!

आपण हे लक्षात घ्यायला हवं की आपण parking मधे मुद्दाम दुसऱ्याच्या ठिकाणी गाडी लावून आपण जर घरी आलो तर ते तेवढ्यावर थांबत नाही. दुसरा आपल्या गाडीकडे बघून जे विचार करतो ते आपल्यापर्यंत कोणत्यातरी मार्गाने पोचतात. करायचं यातून एकच, शक्य तेवढे आपल्याला माहिती असलेले नियम, दुसऱ्याच्या आयुष्यात कमीतकमी त्रास होईल अशा वागणुकीच्या patterns ना follow करा. ‘अरे! मी कोणाचं कशाला ऐकू? दोन मिनिटं तर गेलो होतो’ अशा प्रकारच्या आपल्या विचारांनी फक्त दुसऱ्याला त्रासच होत नाही तर तो त्रास आपण तिथे बघायला नसलो तरीसुद्धा त्याच्या मनातून किंवा त्या लोकसमुदायाच्या मनातून येणारी energy आपल्यापर्यंत येते. हा मुद्दा महिनाभर चिंतनाचा आहे. निश्चित चिंतन करावं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *