माणसाची ओळख कशी बनते?

मी जपानमध्ये असताना माझ्या शेजारच्या खोलीत एक माझा मित्र राहायचा. त्याला आम्ही family man म्हणायचो कारण तो तसाच होता. तो मूळचा मुंबईचा होता आणि रोज जपानमधून मुंबईला घरी फोन करायचा. बाकी सगळे मित्र calling साठी लागणारे रुपये वाचवण्यासाठी आठवड्यातून एकदाच घरी फोन करायचे. पण हा मित्र मात्र रोजच्या calling च्या रुपयांचा विचार न करता दररोज न चुकता घरी फोन करायचा.

हा मित्र जपान मध्ये कशासाठी आला होता तर जेव्हा एखादी कंपनी बाहेरच्या देशात तुम्हाला कामासाठी पाठवते, तेव्हा तुम्ही तुमचा देश सोडून दुसरीकडे राहणार असल्याने तुम्हाला दररोजचा एक विशिष्ट भत्ता मिळतो. त्यामुळे कंपनीकडून जेवढे रुपये मिळतात त्यापेक्षा खूप कमी खर्च होतो. हा मित्र त्याच्या कुटुंबाला सोडून त्याचं मासिक उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने जपानमध्ये आला होता. त्याचा आपल्या कुटुंबावर खूप जीव होता.

एका सुट्टीच्या दिवशी आम्ही सगळ्या मित्रांनी हिरोशिमा बघायला जायचं ठरवलं. त्याच्या खोलीत राहणारे सगळे मित्र sight seeing ला जाणार होते, पण त्याने मात्र sightseeing ला यायला नाही म्हटलं. त्याने सांगितलं की, ‘मी इतकं कमावतोय कारण मला माझ्या मुलीचा पाचवा वाढदिवस मुंबईला जाऊन तिच्याबरोबर साजरा करायचा आहे. ते करण्यासाठी मला रुपये साठवायचे आहेत. आत्ता जर मी हिरोशिमाला आलो तर माझं पूर्ण budget तिथेच वापरलं जाईल. म्हणून मी येणार नाही.’ तो परत कधीही जपानला येऊन हिरोशिमा बघू शकणार नव्हता हे माहित असूनही त्याने sightseeing ला यायला मनाई केली.

बघायला गेलं तर छोटासा प्रसंग आहे, पण यातून एक मोठी शिकवण आपल्याला मिळते. What you do defines you, and what you avoid, reconfirms! (तुम्ही काय करता याने तुम्ही कोण आहात हे ठरतं आणि तुम्ही काय करत नाही त्याने तुम्ही कोण आहात हे पुन्हा अधोरेखित होतं!)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *