शंतनु सर, देवाने आम्हाला दिलेले वरदान
आपल्याला कुठलीही समस्या असो ती सरांकडे गेल्यावर सुटली नाही असे झालेच नाही. सरांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्याला अंधारात ठेवत नाहीत, पण घाबरवतही नाहीत . आपल्याला आपले प्रश्न सोडवायला शक्ति व आशिर्वाद देतात. कितीही वेळा एकच प्रश्न विचाराला तरी अजिबात न रागावता उत्तर देतात , उत्तर बदलत नाही.
सर अशक्य गोष्टी शक्य करतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे मी केलेले रॅपेलिंग. 2018 डिसेंबरला आम्ही "गरुडमाची"ला गेलो होतो तेथे सर्वांनी रॅपेलिंग केले. मला जर कोणी आधी सांगितले असते की तू रॅपेलिंग करशील तर मी त्याला वेड्यातच काढले असते. पण केवळ सरांमुळे मी रॅपेलिंग करू शकले. माझ्या आयुष्यातील तो अविस्मरणीय अनुभव होता. मी स्वभावाने अतिशय भित्री आहे पण सरांमुळे माझा भित्रेपणा कमी झाला आहे. आपल्या बरोबर सर आहेत ही जाणीवच मला 10 हत्तींचे बळ देते. 2019 साली माझ्या भाचीची 2 वर्षांची मुलगी अचानक गंभीर आजारी पडली. लाखात एखाद्याला होतो असा आजार तिला झाला होता. तेव्हा सरांच्या हिलिंगमुळे ती अक्षरशः मृत्यूच्या दारातून परत आली. असे अनेक अनुभव अनेकांना आले असतील.