गुरूश्रींची पहिली प्रत्यक्ष भेट…
एक अतिशय जाणवणारी गोष्ट म्हणजे Pin Point Solution Session (PPSS) चा reminder येण्याआधी, session ची तारीख लक्षात नसेल तरी आत जाणवतं की पुढच्या २/३ दिवसांत गुरूश्रींची भेट होणार आहे. Mobile ची battery संपत येते तशी अवस्था होते. Session झालं की पुन्हा battery full पुढच्या कामांसाठी.
आज जवळ जवळ दीड वर्षापेक्षा जास्त मी PPSS करत आहे. गुरूश्रींनी केलेल्या मार्गदर्शनाचा फायदा रोज होत आहे. अजून खूप लांब जायचं आहे असं वाटतं. आणि हा प्रवास छान असेल असा confidence ही वाटतो.
माझी पहिल्या session पासून ते या session पर्यंत सगळी session online च झाली होती. गुरूश्रींनी एका session ला सांगितलं तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेटा पण शक्य झालं नाही. पण का कोणास ठाऊक गणपतीची सुट्टी लागली आणि वाटायला लागलं आता गुरूश्रींची भेट होणार.
मी दापोलीला राहते आणि जेव्हा तिथून निघाले तेव्हा मी अलकनंदाला विचारलं मी ४/५ दिवस पुण्यात आहे, गुरूश्रींची भेट मिळेल का? त्या म्हणाल्या बघते आणि त्यांनी सांगितलं की तुझी appointment आहेच. खूप आनंद झाला. गुरूश्रींना भेटायची एक ओढ लागली होती. पुण्यात आले. खूप मस्त वाटत होतं. दुसऱ्या दिवशी ११:३० ची भेट होती. तयारी केली. मनात आलं आधी अर्धा तास जावं तिथं छान वाटेल गेल्यावर. त्याप्रमाणे office मध्ये पोचले. तिथे गेल्यापासूनच खूप वेगळं जाणवत होतं. शब्दात वर्णन करणं शक्य नाही. पण आतून एक ओढ जाणवते. खूप वर्षांनी कोणीतरी जवळचं भेटल्यावर जसं वाटतं तसं काहीतरी वाटत होतं. मन भरुन आलं होतं.
आधीचं session संपलं. गुरूश्री बाहेर आले. पहिल्यांदा त्यांना प्रत्यक्ष बघत होते. खूप मस्त वाटत होतं. “बसा आलो” म्हणून गुरूश्री गेले.. मी तिथेच बसले. एक वेगळाच आनंद जाणवत होता. ते आले. मी solution room मध्ये गेले. गुरूश्री समोर बसले होते. मी त्यांच्यासमोर बसले. ती energy वेगळीच जाणवत होती. एक महिन्यामध्ये काय काय नवीन घडलं ते सांगितलं. खूप आनंद होत होता. वेळ पुढे जात होती. पण काय काय बोलू, काय नाही असं झालं होतं. काही मिनिटांनी मी त्यांना विचारलं, मी नमस्कार करु का तुम्हाला? त्यांनी परवानगी दिली. त्यांच्या पायावर डोकं ठेवल्यावर काय वाटलं सांगणं अवघड आहे. असा आनंद मी आधी कधीच अनुभवला नव्हता. खूप वेगळे क्षण होते ते. नमस्कार झाल्यावर आनंदाने जणु रडू आलं. नंतर बोलायला शब्द सुचेनात. PPSS ची वेळ संपत आली होती. पण मला तिथून जावसं वाटत नव्हतं. पापण्या मिटून उघडाव्यात तशी वेळ संपली. असं वाटत होतं घड्याळ थांबलं का नाही?
तिथे जी energy अनुभवली, जो आनंद पुढे अनेक दिवस मनात ‘जसाच्या तसा होता.’ खूप मस्त वाटत होतं. आपल्याला काहीच चिकटलेलं नाही. एका छान मोकळ्या हिरव्या माळरानावर दोन्ही हात लांब करुन, निळ्या आकाशाकडे बघत धावणे आहे. पूर्ण मुक्त आहे सगळं, असं feeling होतं ते. ते चित्र आजही जसंच्या तसं आहे मनात. ही भेट न विसरण्यासारखीच होती. कायम मनात कोरलेली राहील.
धनश्री दांडेकर