स्व-प्रतिमेची किमया!

विमान प्रवास करताना तुम्ही कधी असं अनुभवलं आहे का की business class मधून प्रवास करणारी  सर्वच माणसं आपल्याला सुंदर आणि आकर्षक वाटतात. खरंच ती सर्व माणसं तशीच असतात की आपल्याला ती तशी भासतात? नीट पाहिलं तर असं लक्षात येतं की त्यातील कित्येक चेहरे हे लौकिक अर्थाने सौंदर्याच्या व्याख्येत बसणारे नसतात. त्यांच्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांना सौंदर्याचे कोणतेच मापदंड लागू होत नसतात. परंतु तरीसुद्धा त्यांचं एकूण व्यक्तिमत्व निश्चितपणे आकर्षक असतं. तसंच आपण येता जाताना कधीतरी पहातो की उच्चभ्रू वर्गातील एखादी व्यक्ती एखाद्या आलिशान गाडीतून उतरते. त्यावेळी ती व्यक्तीही तशीच आकर्षक दिसते. याचं कारण काय असेल?

यामागचं खरं कारण आहे ते म्हणजे या सर्व व्यक्तींना ते स्वतः आकर्षक आहेत यावर पूर्ण विश्वास असतो. जेव्हा आपल्याला स्वतःलाच आपण आकर्षक किंवा सुंदर असण्याबद्दल खात्री असते तेव्हा संपूर्ण जगाच्या नजरेत आपण आकर्षक किंवा सुंदरच असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाची जेवढी ओळख आपण स्वतःला करुन देत असतो तेवढीच आपली ओळख समोरच्याला होत  असते. जर ‘आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप कोणावरही पडत नाही’ असं आपलं स्वतःबद्दलचं मत असेल तर खरोखरंच आपली छाप कोणावरही पडणार नाही. आपण स्वतःला जेवढी किंमत देऊ त्यापेक्षा तसूभरही जास्त किंमत कोणीही आपल्याला देणार नाही.

आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण आदर करत असू तर जगालाही आपल्याप्रती तसाच आदर दाखवणं  भाग पडतं हे मी स्वानुभवातून ठामपणे सांगू शकतो. जेव्हा मी नाटकात कामं करायचो तेव्हाची ही गोष्ट आहे. एका नाटकात मी स्त्री पात्र करत होतो. एका प्रयोगाच्यावेळी अगदी आयत्यावेळी कळलं की makeup man येत नाहीये. दिग्दर्शकांनी मला आहे तसंच म्हणजे दाढी, मिशांसहितच स्टेजवर जायला सांगितलं. त्यावेळी स्त्री पात्राचा makeup न करताच मी माझी भूमिका सादर केली आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. स्टेजवर पाऊल ठेवतानाच मी स्वतःला बजावलं होतं की मी आत्ता स्त्री आहे. मी जेव्हा ठामपणे स्वतः स्त्री भूमिकेचा स्वीकार केला  तेव्हा प्रेक्षकांनीही माझा स्त्री पात्र म्हणून स्वीकार केला. ही जादू आहे स्व-प्रतिमेची!

स्व-प्रतिमेची ही  ताकद लक्षात घेऊन आपण सर्वांनी नक्कीच स्वतःची स्वतःबद्दल असलेली प्रतिमा पुन्हा एकदा पारखून घ्यावी असं मला वाटतं. जगाने आपल्याला काय म्हणून ओळखावं हे पक्कं करुन आपणही स्वतःला तसेच ओळखतो ना याची एकदा खात्री करुन घ्यायला हवी. 

2 Comments

  • Deva shatkoti namskar.,
    Apratim msg aahe. Khup sahaj aani sundar prakare samajavale aahe tumhi, nehami pramane.
    For very sure I will follow the same, it is possible only due to your help and support.
    Parmeshwara shatkoti namskar.

  • Gurushree once narrated this incident in a session and from then on I started working on it. I now, eventually feel better about myself and also perceive the same from others. It was indeed delightful to read it once again as I’ve stared to experience it now.
    Thank you 🙂
    🙏🏻🙏🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *