स्वावलंबन

परदेशामध्ये बरेचदा दोन प्रकारच्या गाड्या बघायला मिळतात. एक गाडी म्हणजे आपली नेहमीची कार आणि दुसरी गाडी म्हणजे caravan. ही caravan नेहमीच्या van पेक्षा मोठी असते आणि  या गाडीतच मागच्या बाजूला, गाडी बरोबरच धावणारं चाकांवर असलेलं एक छोटं घर असतं. परदेशात असताना मी अशा अनेक गाड्या बघत होतो आणि तेव्हा कार आणि caravan मधला फरक मला प्रकर्षाने जाणवत होता.

जेव्हा आपली नेहमीची कार चालवत आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि अचानक पाऊस सुरु होतो, तेव्हा आपल्याला चहा किंवा कॉफी घ्यायची इच्छा झाली तरी त्यासाठी आपल्याला एखादं हॉटेल शोधावं लागतं. आणि जवळच एखादं हॉटेल मिळालं आपल्याला तरी पण त्यांच्या check in च्या वेळात जर आपण पोहोचलो, तरच आपल्याला आत जाऊन खाण्या-पिण्याचा आस्वाद घेता येतो. म्हणजेच आपल्या प्रवासातल्या मूडला अनुसरुन काही करायचं झालं तर आपल्याला इतर गोष्टींवर अवलंबून राहावं लागतं.

पण या caravan ची गोष्ट वेगळी आहे. आपल्या प्रवासात जे काही आपल्याला लागणार आहे ते सर्व काही बरोबर घेऊन निघण्याची एक स्वावलंबी वृत्ती. मी परदेशात जिथे होतो तो प्रदेश अतिशय सुंदर, निसर्गाचं वरदान लाभलेला आहे. तिथे जागोजागी पठारं आहेत, छोट्या छोट्या टेकड्या आहेत आणि झरे व तलाव आहेत. अशा जागी फिरताना जर आपल्याकडे carvan असेल तर जिथे कुठे थांबून आपल्याला आपला picnic चा मूड celebrate करावासा वाटेल तिथे थांबून आपण तो celebrate करु शकतो. कारण caravan असल्यामुळे आपण जिथे थांबू तिथेच आपलं हॉटेल असतं. आपले खाद्यपदार्थ आपल्याबरोबरच असतात, आपल्याला हवं ते शिजवून आपण लगेच खाऊ शकतो. Caravan ही स्वतःच्या गरजांचं solution स्वतःच घेऊन चालणाऱ्या स्वावलंबी वृत्तीचं प्रतिनिधित्व करते.

आता आपल्या रोजच्या आयुष्यात थोडं डोकावू. समजा एखादा लग्न प्रसंग आहे. तिथे मी गेल्यावर प्रत्येकजण माझ्याकडे येतो, माझं आगत-स्वागत करतो, माझ्याशी बोलतो आणि मगच मला खूप छान वाटतं. मी घातलेल्या ड्रेसचं कुणी कौतुक केलं तरच मला छान वाटतं. मी एखाद्या गोष्टीसाठी केलेल्या तयारीची कुणी वाहवा केली तरच मी केलेल्या कामाची पावती मला मिळते. माझ्या पोस्टवर खूप likes आले, खूप views आले की मगच मी खुश असतो. असं असणं ही झाली कारसारखी वृत्ती. पण मला छान वाटण्यासाठी मला काय करायचं आहे हे मला पक्कं ठाऊक आहे. मला meditation केल्यावर छान वाटतं, मला एखादं पुस्तक उघडलं की छान वाटतं, एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन आकाश, डोंगर न्याहाळणं याने मी खुश होतो. असं असणं ही झाली caravan ची स्वावलंबी वृत्ती. ‘जे मला हवं आहे, ते solution मी माझ्याबरोबर घेऊनच निघालो आहे’ ही आहे caravan सारखी वृत्ती. आता प्रश्न असा आहे की आपल्याला कोणती वृत्ती जोपासायची आहे? कारसारखी की caravan सारखी?

2 Comments

  • An Eye Opener never ever thought in this manner. Gurushree will help us to enhance our knowledge in various aspects which are unknown to us🙏🏻

  • फार सुंदर उदाहरण . आपल्याला हवे ते करणारे करावं म्हणून सामान आतच असते ह्याचा हा ही अर्थ वाटतो की त्यात मावण्या इतपतच आपल्या गरजा हव्या मर्यादित पण नक्की मला समाधान देणाऱ्या गोष्टीचं मी carry करू शकतो .आनंदाच्या , सुखाच्या त्याच्या स्संसाधनांच्या मर्यादित गरजा प्रथम व्हायला हव्या मग रमता जोगी सारखे catavan मधून फिरता येईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *