मुलांच्या सर्जनशीलतेला चालना कशी द्यावी?

ज्या पालकांना असं वाटतं की माझ्या मुलाने किंवा मुलीने पुढे जाऊन स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करायला हवी, आजचा ब्लॉग हा खास या पालकांसाठी आहे! आपण लक्षात घेऊया की येणारं युग हे सर्जनशीलतेचं (creativity) युग आहे. Out-of-the-box विचार करणारी आणि तो विचार अंमलात आणणारी सर्जनशील माणसंच या युगात टिकून राहतील आणि या युगाचं नेतृत्व करतील. आपल्यालासुद्धा वाटतं की आपल्या मुलाने out-of-the-box किंवा सर्जनशील विचार करावा. मग यासाठी पालक म्हणून आपल्याला काय करता येईल?

सतत नाविन्यपूर्ण पद्धतीने विविध गोष्टी करून बघितल्यानेच सर्जनशीलता वाढते. मात्र मुलं मोठी होत असताना, जेव्हा केव्हा ती नाविन्यपूर्णतेने गोष्टी करतील, तेव्हा त्यांना पहिल्याच प्रयत्नात त्यांना किंवा तुम्हाला अपेक्षित असलेलं यश नाही मिळालं असं होऊ शकतं. अशावेळेस पुन्हा पुन्हा प्रयत्न करून, trial and error करून काही काळाने अपेक्षित यश मिळू शकतं, आणि याच वेळेस कधी कधी काही पालकांकडून एक चूक होते, मुलांना ओरडण्याची किंवा एखादा रट्टा द्यायची! आपल्याला वाटतं की मुलांना एखादी गोष्ट येत नाहीये, तर फटका देणं हा एक सोपा उपाय आहे. यामुळे वेळही वाचेल आणि मुलं ती गोष्ट पटकन करतील.  

पण मी हे सांगू इच्छितो की हा short-term उपाय आहे, या उपायामुळे long-term मध्ये मुलाच्या सर्जनशीलतेचं मात्र नुकसान होतं. यातून मूल असं शिकतं की, “मी वेगळा विचार केला आणि मला अपेक्षित यश नाही मिळालं तर फटका मिळणार आहे. मग मी out-of-the-box विचार न केलेलाच बरा! मी तेच करतो जे आत्तापर्यंत सारं जग करत आलं आहे.” फटका दिल्यावर त्यावेळेपुरतं मूल आपलं ऐकतं खरं, पण मला पुन्हा सांगायचं आहे की यामुळे long-term साठी मुलाचं नुकसान होतं!

मग आता आपल्या ओळखीत जर कोणी मुलांना नवीन गोष्ट शिकवताना, impatient होऊन मुलांना ओरडत असेल किंवा फटका देत असेल, तर आपण काय करायला हवं? मला वाटतं आपण त्यांना असं करण्यापासून थांबवलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *