प्रत्येकाला स्वतःचं Life Purpose माहीत असतं का?
अनेकदा मला Life Purpose बद्दल प्रश्न विचारले जातात. या विषयावर प्रश्न आले की मला नेहमीच खूप आनंद होतो कारण आपल्याला आपला Life Purpose एकदा माहीत झाला आणि आपण त्याच मार्गावर कार्यरत झालो, की आनंद मिळविण्यासाठी आपल्याला वेगळं काहीच करावं लागत नाही. आपण आपसूकच आनंदी होतो.
याच विषयाबद्दल मला एकांनी विचारलं होतं की प्रत्येकाला स्वतःचं Life Purpose माहीत असतं का? तर एका शब्दात याचं उत्तर आहे ‘हो’. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला त्याचं Life Purpose माहीत असतंच. एखाद्या लहान मुलाला जर आपण काळजीपूर्वक observe केलं तर आपल्याला त्या मुलाचं inclination कुठे आहे हे लगेच समजतं. उदाहरणार्थ, एखादा मुलगा लहानपणापासून अतिशय आनंदाने गाड्यांशी खेळत असतो. एखादी मुलगी स्वयंपाक अगदी आवडीने करते किंवा स्वतःच्या आईला त्यासाठी आनंदाने मदत करत असते हे आपण बघतो. ही दोन फक्त उदाहरणं आहेत.
हीच मुलं जसजशी मोठी होतात तसतसे ते आजुबाजूला पाहतात. कोणत्या गोष्टी करणं सहज सोपं आहे, शक्य आहे किंवा अवघड, अशक्य आहे अशी तुलना ते करू लागतात. मूळ जर लक्षपूर्वक एखादी गोष्ट करत असेल आणि आपण त्याचवेळेस त्याला पुन्हा पुन्हा disturb केलं, तर मुलांना असं वाटतं की ते हे करत असलेलं काम इतर कोणाला आवडत नाहीये. आणि त्यामुळे त्यांनी आवडणारी गोष्ट करताना जर मुलांना असं वाटलं की ती गोष्ट इतरांना आवडत नाहीये, तर मुलं ती गोष्ट करणं टाळतात. आपल्या सभोवतीच्या माणसांना काय आवडतं, आपण काय केलं तर त्यांचे लाडके होऊ या विचाराने मुलं स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करणं सोडून देतात आणि इतरांना ज्या गोष्टी आवडतात त्या करायला लागतात. ‘मी ज्यांच्याबरोबर राहतो त्यांना मी आवडलो पाहिजे’ असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. मात्र इतरांना काय आवडेल त्याचा विचार करून त्यानुसार गोष्टी केल्याने आपण आपल्या Life Purpose च्या मार्गापासून दूर जातो. असं होऊ नये म्हणूनच आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येकजण हा एकटा जन्माला येतो आणि हेच आपल्याला सांगतं की त्याचा पुढचा प्रवासही स्वतंत्र असतो!
जर आपण ही शिकवण लक्षात घेतली की प्रत्येकाचा प्रवास हा स्वतंत्र असतो तर कदाचित आपल्याला आपल्या पालकांच्या किंवा आपल्या आजूबाजूच्या इतर व्यक्तींच्या मदतीने आपलं Life Purpose खूप लवकर ओळखता येईल.