उत्सवांचं महत्त्व

जगामध्ये भारताची प्रतिमा काय आहे माहिती आहे का तुम्हाला? इतर देश भारताला ‘Country of Festivals’ अर्थात ‘उत्सवांचा देश’ असं म्हणतात. ‘उत्सव’ या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे ‘दुःख काढून टाकणे’. भारत देशात असणाऱ्या परंपरांचा अभ्यास केला तर हे लक्षात येतं की मानवी मनाचा सखोल अभ्यास करून या परंपरांचा उगम झालेला आहे. उत्सव या शब्दाचा अर्थ जाणून घेतला की उत्सव साजरे करण्यामागचा उद्देश सहज लक्षात येतो. दिवाळी येतेच आहे तर जाणून घेऊया की सकारात्मकता वाढवण्यासाठी उत्सवांची परंपरा आपल्याला कशी मदत करू शकते!

एका सेमिनारमध्ये माझ्याशी बोलताना एक जण म्हणले होते की, ‘चुकीच्या सवयी मनाला लगेच लागतात.’ तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की चुकीच्या सवयी लागणं सोपं असतं, त्या लागण्यासाठी आपल्याला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत आणि म्हणून त्या लगेच लागतात. म्हणजे काय? सकाळी लवकर उठायची सवय लावायला लागते कारण ती चांगली सवय आहे, पण उशिरापर्यंत झोपायची सवय लावायला लागत नाही कारण ती चुकीची सवय आहे त्यामुळे ती आपोआप लागते. असंच नकारात्मक गोष्टींचंसुद्धा असतं. आपलं मन नकारात्मकतेकडे झुकण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ, जर रस्त्यावर अपघात झाला तर कितीतरी जण “काय झालं हो? अपघात झाला का? सगळं चांगलंय ना? कोणाचा पाय मोडला का?” असं विचारताना दिसतात. मात्र जर रस्त्यावर नवीन गाडी लावली असेल तर मुद्दामहून त्या गाडीच्या मालकाचं अभिनंदन करताना दिसत नाहीत. अपघात झाल्यावर मात्र जास्त जण तिथे गर्दी करतात. असं का? कारण हीच आहे मानवाची psychology!

मानवाचं मन हे negative गोष्टींकडं लवकर झुकतं. हे थांबवण्यासाठी काय करता येईल? तर माणसाला जास्तीत जास्त वेळ celebration च्या mode मधे ठेवायचं म्हणजे तो पटकन negativity कडे झुकणार नाही. तुम्ही बघा, जर तुम्ही काही celebrate करत असाल मग तो friendship day असू दे, saree day असू दे, किंवा tie day असू दे. त्यादिवशी तो दिवस celebrate करण्यासाठी जर तुम्ही tie घातला, साडी नेसली किंवा एखाद्या मित्राला भेटायचं ठरवलं, तर तुम्ही celebration mode मधे असल्यामुळे तुमचा तो दिवस खूप चांगला असतो आणि हाच अनुभव पुन्हा पुन्हा घेण्यासाठी उत्सवांची ही परंपरा सुरु झाली असावी.

उत्सव साजरे करताना त्यांच्यामागचं शास्त्र कळल्यावर मला नक्की खात्री आहे की तुम्ही सगळे आता scientifically proven अशा fact सह नव्या पद्धतीनं आणि मनापासून येणारे सगळे उत्सव साजरे करणार आहात. आता दिवाळी येतेच आहे. छान celebrate करूया!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *