आशीर्वाद आणि शाप यांचं विज्ञान
‘आशीर्वाद आणि शाप कसे काम करतात?’ असा प्रश्न मला विचारला होता. एका वाक्यात सांगायचं झालं तर हे दोन्ही energy science नुसार काम करतात. म्हणजे काय तर तुम्ही जर जप करत असाल, पोथी वाचत असाल, ध्यान करत असाल किंवा मनाला affirmations देत असाल तर या कृतींमध्ये तुम्हाला ऊर्जा मिळते. तुमचं मन हे सर्व करत असताना focused असतं. जेव्हा मन इकडे तिकडे भरकटत असतं, तेव्हा ऊर्जा वाया जात असते. जी ऊर्जा तुम्हाला हे सगळं करण्यात मिळते, ती तुमच्या आत save होते.
जेव्हा कोणीतरी तुम्हाला नमस्कार करतं आणि तुम्ही त्यांना म्हणता की ‘तुझी सर्व मनोकामना पूर्ण होवोत’ तेव्हा हीच save केलेली ऊर्जा वापरली जाते. ही ऊर्जा जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या चांगल्यासाठी वापरता, तेव्हा त्या ऊर्जेचा आशीर्वाद देण्यासाठी वापर होतो आणि याच्या उलट जेव्हा ही ऊर्जा दुसऱ्याचं वाईट व्हावं या इच्छेसाठी वापरली जाते तेव्हा तीच ऊर्जा शाप देण्यासाठी वापरली जाते.
हे समजून घेण्यासाठी अजून एक उदाहरण बघूया. वीज म्हणजे electricity चा वापर तुम्ही कोणालातरी shock देण्यासाठी करू शकता किंवा त्याच वीजेचा उपयोग air conditioning चा वापर करून हवा थंड करण्यासाठीसुद्धा करू शकता. वीज neutral असते, ती कशी वापरता त्यानुसार result काय येणार हे ठरतं. त्यानुसारच जेव्हा energy दुसऱ्याचं चांगलं व्हावं यासाठी वापरता तेव्हा तिचा वापर आशीर्वाद देण्यासाठी होतो आणि जेव्हा दुसऱ्याचं वाईट व्हावं यासाठी वापरता तेव्हा त्या ऊर्जेचा वापर शाप देण्यासाठी होतो. हे आहे आशीर्वाद आणि शाप यांचं विज्ञान!
तुम्ही कदाचित बघितलं असेल की काही घरांमध्ये जेव्हा त्या घरातील व्यक्तींना कोणीतरी नमस्कार करतं तेव्हा त्या व्यक्ती खिशातून रुपये काढून देतात. असं का? कारण त्यांना त्यांची energy save करायची असते आणि कोणीतरी नमस्कार केला तर मला काहीतरी त्या व्यक्तीला द्यायचं आहे या इच्छेने त्या व्यक्ती रुपये देतात.
जसा हा प्रश्न मला विचारला होता, तसेच काही प्रश्न जर तुम्हाला पण असतील तर मला ते प्रश्न नक्की विचारा. मला तुमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला आवडतील!