आर्थिक प्रश्नांचं एकमेव उत्तर!

समजा एक व्यक्ती आहे जिला सलग एका तासासाठी धावायचं आहे. मात्र तिच्याकडे सलग एक तास धावण्याची क्षमता नाहीये. आणि जर आपण तिला तेवढा वेळ धावता यावं म्हणून हलक्या वजनाचे बूट दिले, तर त्यामुळे ती व्यक्ती सलग एक तास धावू शकेल का? समजा आपण आणखीन हलक्या वजनाचे बूट दिले किंवा बाहेरच्या देशातून तसे बूट आणले आणि ते तिला दिले तर आता तरी ती व्यक्ती सलग एका तासासाठी धावू शकेल का बरं? हे वाचताना तुम्हाला नक्कीच असं वाटलं असेल की हा काय प्रश्न विचारतोय मी, जर एखाद्याची एक तास धावायची क्षमताच नसेल तर कितीही हलके बूट द्या, ती व्यक्ती थोडीच एक तास धावू शकणार आहे?

मी हे उदाहरण यासाठी दिलं कारण याच प्रकारचा एक गैरसमज सध्या लोकांच्या विचारांमध्ये घर करून बसला आहे. आर्थिक चणचण असेल, रुपयांचा प्रश्न असेल तर लोकांना असं वाटतं की मला जास्त रुपये मिळाले की हा प्रश्न सुटणार आहे, माझी आर्थिक चणचण दूर होणार आहे! याबद्दलचीच एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे.

लॉटरी विजेत्यांचं एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं आणि यातून एक भीषण सत्य समोर आलं. लॉटरी जिंकलेल्या किंवा reality show मधून १ करोड रुपये मिळालेल्या १० पैकी ९ जणांची आर्थिक परिस्थिती पुढच्या २ वर्षांत पूर्ववत झाली. म्हणजे रुपये जिंकायच्या आधी ते ज्या आर्थिक परिस्थितीत होते, २ वषांनी ते पुन्हा त्याच परिस्थितीत आले. हे आहे financial IQ चं महत्त्व, हे आहे money behaviour चं ज्ञान असण्याचं महत्त्व!

More money with no awareness of money behaviour won’t solve problems! म्हणजे कशाने आपल्याकडच्या रुपयांमधे वाढ होते, कशाने ते आपल्यापासून लांब जातात, रुपयांबद्दल याप्रकारची माहिती नसताना नुसतेच खूप रुपये असण्याने आपले आर्थिक प्रश्न सुटत नाहीत!

आपण अमिताभ बच्चनांसारखी उदाहरणेदेखील बघतो की जे एकदा बँकेच्या कर्जात एवढे बुडले होते की त्यातून वर येणं अवघड होऊन बसलं होता. मात्र त्यानंतर ते एवढे वर आले की ते पूर्वीपेक्षाही अधिक सधन झाले. ते दुसऱ्या टोकाला कसे पोचले याचं कारण आहे money behaviour च ज्ञान!

आपल्याला स्वतःला हे समजवायचं आहे की आपल्याला financial IQ वर काम करायचं आहे. जसं क्षमता नसणं या प्रश्नाचं ‘हलक्या वजनाचे बूट’ हे उत्तर नसू शकतं, तसंच आर्थिक प्रश्नांवर ‘खूप रुपये कमवणं’ हे उत्तर नसू शकतं, त्यासाठी ‘financial IQ’ याच्यावरच काम केलं पाहिजे!

2 Comments

  • नमस्कार गुरूश्री,
    Financial behaviour che example manala atishay ruchanare aani buddhila patnare aahe. Yatun vartanatil goshti tikvun bhavishya arthik drustya saksham karayacha vishwas milato.
    Tarihi financial IQ samajun ghyayala nakki aawadel
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • नमस्कार गुरुश्री
    फायनानसिअल IQ म्हणजे नक्की काय आणि तो कसा असावा याबद्दल जाणून घेयला आवडेल, तो कसा डेव्हलोप करता येइल त्यासाठी काही काय नियोजन करावे हे समजून घायला हवं
    🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *