आजपासून ५ वर्षांनी आपलं आयुष्य कसं असेल, हे जाणून घ्यायचं असेल तर एक गोष्ट पाहायला
हवी—जेव्हा आपल्या आजूबाजूला कोणीही नसतं, तेव्हा आपण काय करतो? आपण एकांतात जे करतो,
पुढे जाऊन आपण तेच बनतो.
म्हणजे काय? तर जेव्हा आपल्याकडे कोणाचं तरी लक्ष असतं, तेव्हा आपण ती व्यक्ती impress होईल असं
काहीतरी करायला जातो. किंवा ‘मी अमुक प्रकारचा फोटो जर social media वर post केला, मी अमुक
प्रकारे जर व्यक्त झाले तर मला खूप likes, comments आणि compliments मिळतील’ या प्रकारचा
outward focus असलेला विचार करून आपण आपले निर्णय घेतो. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट
करण्यापेक्षा ती इतरांना दाखवण्यावर जास्त लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपल्या चारित्र्याचा पाया कमकुवत
होऊ लागतो. याउलट, जेव्हा आपल्याला कोणीही बघत नसतं, तेव्हा आपण आपल्या वेळेचा उपयोग कसा
करतो आणि सातत्याने काय करत राहतो, यातून आपलं character घडत असतं.

आपल्या character चा आणि आपल्या भविष्याचा थेट संबंध आहे. आपल्या चारित्र्याचा आणि आपल्या भविष्याचा जवळचा संबंध आहे. आपलं चारित्र्य जितकं भक्कम, तितकं आपलं भविष्य उज्ज्वल असतं!

उदाहरणार्थ, अभ्यास करतो आहे असं दाखवणारा आपण photo काढला आणि तो social media वर post केला तर थोड्यावेळाने photo ला भरपूर likes नक्की मिळतील, कदाचित तुमचे followers पण वाढतील, पण त्या photo ने तुम्ही परीक्षेत पास नाही होऊ शकत. तसंच आपण व्यायाम करतो आहे असा photo काढला आणि तो social media वर post केला तर थोड्यावेळाने photo ला भरपूर likes नक्की मिळतील, पण त्याने तुमचं वजन कमी/जास्त होणार नाही.आजपासून ५ वर्षांनी आपण त्याच गुणवत्तेचं आयुष्य जगू ज्या गुणवत्तेचं काम आपण आज करत असू जेव्हा आपल्याकडे कोणी बघतही नसेल!

मी असं म्हणत नाहीये की अभ्यास करतानाचा photo तुम्ही कुठे post करू नका, पण अभ्यास करताना फोटो काढण्याचा निर्णय तुमचं character दुर्बल व्हायला मदत करतो. यापेक्षा अभ्यास पूर्ण झाल्यावर जर तुम्ही फोटो काढला आणि मग पुन्हा अभ्यास continue केला, थोड्यावेळाने break घेतल्यावर social media वर पोस्ट केला तर हा निर्णय तुमचं character मजबूत करतो. कारण तुम्ही अभ्यास करतानाची pose
नव्हती दिली, खरोखर अभ्यास करताना फोटो काढला होता.
आपला focus आपण काय करतोय हे इतरांना दाखवण्यापेक्षा, ती गोष्ट करण्याकडे किंवा ती quality विकसित करण्याकडे हवा. म्हणूनच, 5 years from now, life will reflect what we did every time when
no one was watching us!