संगीताचा प्रभाव

गाडी चालवताना गाणी ऐकायला कोणाला आवडत नाही? आपण बहुतेक सर्वजण गाडी चालवताना गाणी ऐकतो. गाडीतला आपला प्रवास हा कधी एकट्याचा असतो, कधी कुटुंबाबरोबर असतो तर कधी मित्रांबरोबरही असतो.

अशा प्रवासादरम्यान आपण कोणत्या प्रकारची गाणी ऐकावीत, या गाण्यांचा आपल्या गाडीच्या वेगावर काय परिणाम होतो असा एक विचार मी आज आपल्यासमोर मांडत आहे. ही गाणी जर ‘छम्मक छल्लो’ किंवा ‘बलम पिचकारी’ या गाण्यांसारखी fast track गाणी असतील तर ती ऐकत ऐकत गाडी चालवताना आपल्याही नकळत गाडी वेगाने पळू लागते. याउलट जर गाडीत बासरीचे सूर ऐकू येत असतील, ‘कभी कभी मेरे दिल में’ किंवा किशोरजींनी गायलेले ‘एक लडकी भीगी भागीसी’ ही गाणी चालू असतील तर गाडीचा वेगही आपसूकच धीमा राहतो. गाडीत चालू असलेल्या गाण्यांची गती आणि गाडीचा वेग यातील हा संबंध आपण अनुभवू शकतो. म्हणूनच मी तर म्हणेन की गाडी चालवताना नेहमी शांत गाणी ऐकावीत. 

कान हे एक ज्ञानेंद्रिय आहे. त्यामुळे कानांनी आपण जे ऐकतो त्याचा काही एक विशिष्ट परिणाम आपल्या मनावर होतो. याचाच उपयोग आपण वर पाहिलेल्या गाण्यांच्या उदाहरणातून अनुभवू शकतो. आजवर जर हा अनुभव आपण घेतला नसेल तर आता लक्षपूर्वक हा गाण्यांचा प्रयोग आपण नक्कीच करुन पाहू शकतो.

2 Comments

  • Above thoughts are really amazing never thought of this.
    While driving I now always prefer to play silent songs which really impacted on my driving.

  • Namaskar 🙏 thank you for the blog, I really experience this every time, specially when there is disco music on radio I tend to get irritated with other’s driving and try to take cuts with the beats of music. Now I will make sure to put on better music while driving, thank you again GuruShree 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *