मुलांचे संगोपन करताना…
तुम्ही कधी glass house बघितलं आहे? Glass house च्या आतमध्ये तापमान नियंत्रित केलेलं असतं. मी जेव्हा glass house मध्ये गेलो होतो, तेव्हा तिथलं तापमान ३०0 C होतं. मात्र त्यावेळी बाहेरचं तापमान १५0 C होतं. मी थंड हवेच्या ठिकाणी हे glass house बघितलं होतं, अर्थातच थंडी असल्यामुळे तिथे नारळ, केळी अशी झाडे वाढत नाहीत. या झाडांना वाढीसाठी समुद्रावरची दमट-उष्ण हवा लागते. ती इथे या प्रांतात नव्हती. मग या झाडांना आवश्यक, पोषक असं वातावरण glass house मध्ये मुद्दाम तयार केलं गेलं होतं आणि त्यामध्ये या झाडांची लागवड करुन त्यांना वाढवलं जात होतं.
जसं झाडांच्या वाढीसाठी glass house असतं, त्याप्रमाणेच आपल्या घरातल्या मुलांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असं वातावरण आपण आपल्या घरात मुद्दाम तयार करु शकतो का? मुलांच्या वाढीमध्ये आपल्या घरातल्या वातावरणाचा अगदी सिंहाचा वाटा असतो. त्यामुळे जगातल्या इतर घडामोडींच्या उठाठेवींवर होणाऱ्या चर्चा करण्यापेक्षा आपल्या घरात जन्मलेल्या या उद्याच्या नागरिकांची वाढ होण्यासाठी घरात काय प्रकारचं वातावरण घरात जोपासलं गेलं पाहिजे यावर आपण विचार केला पाहिजे.
आत्ताच्या काळात मुलांसाठी पोषक वातावरण तयार करताना आपण टाळू न शकणारा एक मुद्दा म्हणजे ‘screen time’. screen time विषयी मुलं खूप demanding असतात असं सगळ्याच पालकांचं निरीक्षण असतं. आपल्या घरात मुलांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करत असताना, screen time चा विचार कसा गेला जाऊ शकतो याबद्दलचा एक अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे.
एकदा मी आपल्या care providers आणि त्यांच्या कुटुंबियांना घेऊन गोशाळेमध्ये गेलो होतो. अर्थातच आमच्या बरोबर लहान मुलंसुद्धा होती. एक तासभर आम्ही गोशाळेत होतो. आम्ही सर्वजण गायी बघत होतो, त्यांना खायला घालत होतो. गायींचं निरीक्षण करण्यात, त्यांना खाऊ भरवण्यात पालकांच्याबरोबरीने ही मुलं इतकी रमली होती की त्या तासाभरात कोणत्याही मुलाने कुठलाही screen मागितला नाही.
मुलांना screen बघून आनंद मिळतो हे मान्य. पण जेव्हा एखादी गोष्ट त्यांना त्या screen पेक्षाही अधिक मनोरंजक वाटते, जास्त आनंद देणारी, साहस आणि नाविन्याचा अनुभव देणारी असते तेव्हा त्याच मुलांना screen ची आठवण सुद्धा होत नाही. मुलांचं मन screen साठी आसुसलेलं नसतं तर त्यांच्या मनाला नाविन्याची, साहसाची आणि त्यामुळे मिळणाऱ्या आनंदाची ओढ असते.
मुलांचं संगोपन करताना घरातील वातावरणात नाविन्य व साहसाचा अनुभव मुलांना कसा द्यायचा यावर तुम्ही विचार कराल, याची मला खात्री आहे!