आयुष्य अधिकाधिक सोपे करण्यासाठी…

घाईघाईने युद्धावर निघालेल्या एका राजाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. हा राजा लढाईला जाण्यापूर्वी आपल्या सगळ्या सैनिकांनी त्यांच्या तलवारींना नीट धार केली आहे ना, त्यांच्या म्याना, ढाली त्यांनी घेतल्या आहेत ना याची विचारपूस करत असतो. याच युद्धाच्या तयारीमध्ये असताना राजाचा एक सेवक धावत पळत एक निरोप घेऊन येतो. राजाला भेटायला एक शस्त्रविक्रेता आलेला असतो व  त्याने आणलेले शस्त्र हे  युद्ध जिंकण्यासाठी राजाच्या कामी येईल असे तो सांगत असतो. हे ऐकून राजा उत्सुकतेने त्या विक्रेत्याशी बोलायला येतो. त्या विक्रेत्याने राजासाठी machine guns आणलेल्या असतात व तो सांगत असतो की या बंदुकी तुम्ही माझ्याकडून विकत घ्या कारण एकाच वेळी या बंदुकीतून अनेक गोळ्या निघतात येतात त्यामुळे तुम्हाला या बंदुकींच्या साहाय्याने शत्रूचा लवकर पराभव करता येईल. हे ऐकत असतानाच राजा त्याला म्हणातो की माझे सैनिक त्यांची आत्ताची शस्त्र घेऊन युद्ध जिंकण्यासाठी सज्ज आहेत त्यामुळे या धावपळीमध्ये मी तुला अजिबात वेळ देऊ शकत नाही. आणि हे म्हणून राजा तिथून निघून जातो.

आता या गोष्टीचे तात्पर्य काय आहे तर आपल्या सद्यस्थितीमध्ये थोडेफार बदल केल्याने आपला भविष्यातील मार्ग सुकर होऊ शकतो व आपण त्या बदलांचा स्वीकार केला पाहिजे नाहीतर ज्याप्रमाणे या राजाने तात्कालिक अडचणींचे कारण सांगून भविष्यातील मार्ग सोपा करण्याची संधी गमावली त्याप्रमाणेच आपणसुद्धा अशा संधी गमावू.

आपल्या आयुष्यात कोणते बदल करायचे हे समजण्यासाठी आपल्या गुरुस्थानी असलेल्या व्यक्तींकडून  ज्ञान ग्रहण करा. त्यांची sessions, webinars, retreats मध्ये सहभागी व्हा, त्यांचे videos बघा! आणि जेव्हा हे बदल तुम्ही तुमच्या आयुष्यात कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आयुष्य अधिकाधिक सहज आणि सोपे होत जात आहे. 

लक्षात घ्या, रांगणारे मूल आनंदात असते. हळूहळू ते उभे राहून चालायचा प्रयत्न करु लागते. या काळात चालण्यासाठी त्याची अखंड धडपड चालू असते आणि एक दिवस त्याच्या या प्रयत्नांना यश लाभते. आता रांगण्यापेक्षा चालणे हे त्याला जास्त सोयीचे आणि जास्त फायद्याचे आहे हे समजते. लहान मुलासारखीच प्रत्येकवेळी पुढची पायरी गाठताना आपल्याला सतत परिश्रम करायचे आहेत आणि चिकाटीने पुढची पायरी चढायचीच आहे याचे अखंड भान ठेवावे लागते. पुढच्या पायरीवर आयुष्य आणखीन सोपे होणार आहे याची जाणीव ठेवायला लागते. पुढे होणाऱ्या बदलांचं चित्र सतत मनःचक्षुंसमोर जागे असायला हवे. एकदा का हे झाले की मग बघा तुमचे नंतरचे आयुष्य किती आनंददायी होते!   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *